मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

महापौरांच्या हस्ते ई - लायब्ररीचे लोकार्पण

       

                जोगेश्वरी  पूर्व विभागाचे शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगर पालिकेच्या व दत्ताराम गोविंद वायकर ट्रस्ट यांच्या  माध्यमातून साकारलेले हे खास शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांकरिता भव्य व साहित्य साधनाने संपन्न असे ई - लायब्ररीचे रविवारी  दिनांक १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी मुंबईचे महापौर श्री सुनील प्रभू यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले .  या लायब्ररीमध्ये १५ संगणक वातानुकुलीत वातावरणामध्ये असून विध्यार्थ्यांना ज्ञानभांडार खुले करण्यात आलेले असून विविध विषयांवरील अभ्यासोपयोगी तसेच ऐतिहासिक, मान्यवरांचे चरित्र , सर्व सामान्य ज्ञान , अश्या अनेक क्षेत्रातील भरपूर पुस्तकेसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत .  मुलांना निवांत जागी अभ्यास करता यावा म्हणून एक स्वतंत्र दालन व गट चर्चेकरितासुद्धा  स्वतंत्र दालनाची व्यवस्था आहे. या बरोबरच जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा व मन रिझवावे याकरिता कॅरम , बुद्धिबळ  , असेच अनेक करमणुकीच्या साधनांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे  मोफत वृत्तपत्र वाचनाचा एक वेगळा कक्ष केला आहे. या सर्व साधनांचे उद्घाटन महापौर श्री सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.  या बरोबरच जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील एकूण ७ प्रभागामधील दहावी व बारावीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विध्यार्थ्यांचा महापौरांच्या व विभागप्रमुख आमदार डॉ  अनिल परब यांच्या व मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला .आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या कार्याचा संपूर्ण आलेख नागरिकांना कळावा व नागरिकांच्या तक्रारी व सूचनासुद्धा त्यांना कळाव्या म्हणून त्यांच्या  वेबसाईट चे उद्घाटन सुधा महापौरांच्या हस्ते करण्यात आले . श्रमिक विद्यालयाच्या स्काउट च्या विध्यार्थ्यानी सुंदर संचलन करून मान्यवरांचे स्वागत केले . 
                  या प्रसंगी बोलताना महापौरांनी आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरीचा कायापालट करण्याऱ्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या हातून अश्याचप्रकारच्या समाजोपयोगी कामाबाबत शुभेच्छा व्यक्त करून त्यांना महापौर या नात्याने आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगितले. या लायब्ररीचा शिक्षण क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्या व प्रतिकूल परीस्थित शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांनी या विद्यार्जन वास्तूचा पुरेपूर लाभ घ्यावा असेही महापौर म्हणाले .   मुंबईमध्ये अश्याप्रकारच्या सुमारे २५० लायब्ररी पुढील काही वर्ष्यात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात येतील असेही सांगितले. 
              या प्रसंगी विभागप्रमुख Advocate अनिल परब , महिला विभाग संघटक साधना माने , युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर , युवासेना सचिव प्रवीण पाटकर, उपविभाग प्रमुख विश्वनाथ सावंत , अनंत भोसले,उपविभाग संघटक शालिनी सावंत, रचना सावंत ,नगरसेवक अनंत नर, जितेंद्र वळवी , मंजिरी परब ,माजी नगरसेवक प्रवीण शिंदे ,  सुरेश गांगण, सर्व शाखाप्रमुख व सलग्न संघटनांचे पदाधिकारी व विध्यार्थी व पालकवर्ग, जेष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा