आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नाने मुंबई महानगरपालिकेच्या निधीमधून पूनमनगर येथे २६.११ च्या अतिरेकी हल्ल्याला प्रतिउत्तर देताना शहीद झालेले ए टि एस प्रमुख हेमंत करकरे यांच्या बलिदानाच्या स्मृती जागृत ठेवण्याकरिता शहीद हेमंत करकरे उद्यान निर्माण केले गेले. दिनांक ३ जानेवारी रोजी हे उद्यान सन्मानीय सौ मनीषा रवींद्र वायकर यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.
या उद्यानामध्ये विविध सुविधा व सुशोभीकरण इत्त्यादी करिता ७ कोटी मंजूर करण्यात आले असून अत्त्यंत सुंदर असे हे उद्यान करण्यात आले आहे. या सोहळ्यास उपविभाग प्रमुख अनंत भोसले, महिला उपविभाग संघटक सौ रचना सावंत, डॉक्टर अमेय पोतनीस,दीप्ती पोतनीस,शाखाप्रमुख बाळा नर, उदय हेगीस्ते, ज्ञानेश्वर सावंत, प्रियांका अम्बोलकर, मनोहर आडारकर भाई मिर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा