जोगेश्वरी पूर्व येथील अंबिका नगर मध्ये युवा सेने तर्फे ११ वी मध्ये प्रवेश घेण्याकरीता विद्याथ्र्यांसाठी मोफत ऑनलाईन प्रवेश सुविधा उपलब्ध केली गेली आहे. भाग्यसंकेत कम्प्युटर क्लासेस तर्फे आयोजित या सेवेचे उदघाटन शुक्रवारी शिवसेनेचे स्थानीय उपविभाग प्रमुख विश्वनाथ सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
भाग्यसंकेत क्लासेसचे संचालक व युवा सेना कार्यकर्ता विजय पवार यांनी सांगितल्यानुसार शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही तिसऱ्या वर्षी शिवसेने तर्फे मोफत ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शुक्रवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये पहिल्याच दिवशी बहुसंख्य विद्याथ्र्यानीं या सेवेचा लाभ घेतला. या कार्यक्रमास शाखा प्रमुख प्रदिप गांधी, उपशाखा प्रमुख विवेक म्हात्रे, भारतीय विद्यार्थी सेना संघटक कालीदास कांदळगांवकर तथा व्यापार विभागाचे भाई मिर्लेकर आदि शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.युवा सैनिकांनी स्थानिक विद्यार्थांना असे आवाहन केले आहे की त्यांनी मोफत सुविधाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीकरीता विजय पवार यांच्याशी ९८९२१९४९०१ वर संपर्क करू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा