सोमवार, १९ डिसेंबर, २०११

बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आमदार यांनी केले दिनदर्शिकेचे प्रकाशन



  जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री रवींद्र वायकर यांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिवसेना कार्याप्रमुख मा. श्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने दिनदर्शिकेची निर्मिती केली.  काल दिनांक १८ डिसेंबर रोजी मातोश्री बंगल्यावर शिवसेनाप्रमुख मा.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते कार्याप्रमुख मा. श्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या दिनदर्शिका संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील रहिवाश्यांना मोफत देण्यात येणार आहेत.  
   या प्रसंगी महिला विभाग संघटक सौ. साधना माने, उपविभाग प्रमुख अनंत भोसले, विश्वनाथ सावंत, उपविभाग संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, नगरसेवक सुदेश गांगण, शाखाप्रमुख बाळा नर, जयवंत लाड, अमर मालवणकर, परदीप गांधी, सुभाष मांजरेकर, उदय हेगीस्ते, व्यापार्विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, भाई मिर्लेकर, महिला शाखा संघटक शैलजा नरवणकर, प्रियांका अम्बोलकर, मंजिरी परब, दिपाषा पवार, अनिल म्हसकर, नरेंद्र पेडणेकर, रवींद्र साळवी, नरेंद्र परब, आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा