सोमवार, ३० जानेवारी, २०१२

जोगेश्वरीत शिवसेनेने कसली कंबर



रविंद्र वायकर यांच्या वार्ड मधून अनंत नर यांची उमेदवारी
    (प्रतिनिधी दि. ३०.) मुंबई. जोगेश्वरी विभागामधून आज महायुतिच्या सर्वच उमेदवारांनी नामांकन पत्र भरून निवडणुकीच्या प्रचारासाठी वंâबर कसली. शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या उपस्थितीत ५ उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले. वार्ड क्रमांक ४७-जितेंद्र वळवी, ४८-सुनिल प्रभु, वार्ड नं. ६८-अनंत (बाला) नर, ६७ - मंजिरी परब, ६९ -शिवानी शैलेष परब, तर  ७० मधून आरपीआईचे काका खंबालकर इत्यादी उमेदवारांनी आज नामांकन पत्र आज निवडणूक निर्णय अधिकाNयांकड़े सादर केले. यांच्या व्यतीरिक्त भाजपाची नगरसेविका उज्वला मोडक या वार्ड नं. ६६ मधून उद्या (ता.३१) अर्ज भरणार असून, वहीं वार्ड नं. ७० मधून ज्ञानेश्वर सावंत यांनी अपक्ष उमेदवारी साठी अर्ज दिला आहे.
    अंधेरी पूर्व येथिल गुंदवली मनपा शाळेत वार्ड नं. ६६ ते ७३ साठी आजपर्यंत फक्त ३६ इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिला आहे. निवडणूक निरिक्षक अधिकारी गिरीश बागवे यांनी माहीती दिली की सोमवार पर्यंत इच्छुक उमेदवारांनी २६८ अर्ज नेले आहेत. ज्यामध्ये आज वार्ड ६५ मधून ४, वार्ड ६७ मधून ४, ६८मधून १, ६९ मधून ६, ७० मधून ८, ७१ मधून ३ व ७३ मधून १ असे अर्ज भरण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा