पावसाळी अधिवेशन गृहनिर्माण सोसायट्यांच्या पथ्यावर
आज दिनांक १ ७ जुलै २ ० १ ३ रोजीच्या अधिवेशनामध्ये डीम कन्वेन्सबाबत मांडलेल्या लाक्षवेधीमधील चर्चेत शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी भाग घेऊन तीन महत्वाच्या सूचना मांडल्या व संबंधित गृहनिर्माण राज्यमंत्री श्री सचिन अहिर यांनी श्री वायकर यांच्या तीनही सूचनांचे स्वागत केले व या महत्वाच्या सूचना शासनाच्या विचाराधीन असतील व यातून सकारात्मक प्रयत्नही करू असे शासनामार्फत आश्वासन दिले .
सरकारने जाहीर केलेल्या या डीम कन्वेन्सबाबत सुरवातीला गृहनिर्माण संस्थाना दिलासा मिळाला परंतु यातील प्रक्रियेमधील अनेक जाचक अटी व शर्तींची पूर्तता करता करता सोसायटीच्या नाकी नऊ येऊ लागून हळू हळू उत्साह कमी होऊन सोसायट्या याबाबत निरुत्साही होऊ लागल्या व ही सरकारची योजना फेल ठरली याकरिता आज लाक्षावेधीमध्ये आमदार रवींद्र वायकर यांनी चर्चेत भाग घेऊन सांगितले कि
१ ) यापूर्वी या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संस्थाना अनेकप्रकारचे कागदपत्र गोळा करावे लागत व ते काम मुश्किल ठरायचे त्यातील जमीन मालक व विकासक यांच्यातीलच संबंधित कागदपत्र मागवावेत .
२ ) या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संस्थाना डीम कन्वेन्स करिता भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्क भरण्याकरिता सुद्धा पुष्कळ धावपळ करावी लागते व चालू बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क आकारले जाते ह्या कारणास्तव देखील सोसायट्या याबाबत निरुत्साही होऊ लागल्या म्हणून सरकारने यापुढे ज्यावेळी नोंदणी केली गेली त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क आकारावे व एक खिडकी योजना राबवावी .
३ ) या करिता अभय योजना कार्यान्वित करून मुदतही देण्यात यावी .
अश्याप्रकारच्या महत्वाच्या ३ सूचना श्री रवींद्र वायकर यांनी आज लक्षवेधीच्या चर्चेच्या वेळी मांडल्या .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा