बुधवार, ३ जुलै, २०१३

बांदिवली विद्या मंदिर शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा


   


     जोगेश्वरी पूर्वेकडील शिव टेकडी येथील बांदिवली   विद्या मंदिर ट्रस्ट   ची बांदिवली विद्या मंदिर ह्या शाळेला ५ ० वर्षे पूर्ण झाल्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आज दिनांक १ १ जून २ ० १ ३ रोजी सकाळी सुप्रीमो सेंटर येथील महारानी हॉल मध्ये साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पदी स्थानिक शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर व अध्यक्ष स्थानी उद्योजक श्री मधुसूदन वखारिया  होते . 
     कार्यक्रमाच्या सुरवातीला शाळेतील विध्यार्थ्यानी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले .  संस्थापक श्री देऊलकर , संस्थेचे अध्यक्ष अडहोकॅट  श्री महाडिक, आर आर कदम, नगरसेवक अनंत नर, आदी पदाधिकारी व आजी माजी शिक्षकगण , विध्यार्थी , तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते माजी मुख्याधापक, शिक्षक यांचा सत्कार   करण्यात आला .  जोगेश्वरीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना एक चांगले नागरिक बनउन  विविध क्षेत्रामध्ये भरीव कार्य करणारे विद्यार्थी घडवले गेले या मध्ये वकील, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी असे अनेक मान्यवर आहेत. या सगळ्यांची शाळेने आठवण ठेवली हेच महत्वाचे आहे असे श्री वायकर म्हणाले .  माजी संस्थापक कै देऊलकर यांच्या मुलाने शाळेला ५ १ ० ० ० /- ( एक्कावन हजार रुपयाची देणगी दिली . व ओबेरॉय बिल्डर चे श्री अरुण कोटियन यांनी ( रुपये १ ० ० ० ० ० /- )एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली . 
या प्रसंगी शिवसेनेचे उपविभागप्रमुख अनंतराव भोसले, विश्वनाथ सावंत, कैलाशनाथ पाठक, मधु बिल्डर चे प्रतिनिधी श्री खत्री माजी विध्यार्थी अडहोकॅट भाई मिर्लेकर, प्रदीप मुणगेकर, शल्यक हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर अविनाश मळगावकर आदी विद्यार्थी उपस्थित होते. रूपरेखा व आयोजन मुख्याध्यापक श्री दीपक पडावे, हेमंत पाटील, सोनावणे सर यांनी समर्थपणे केले व इतर शिक्षकगण व माजी विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा