सोमवार, २ जानेवारी, २०१२

जोगेश्वरीत युवासेनेचे विद्यार्थांना मार्गदर्शन शिबीर




  जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री रवींद्र वायकर व युवसेना सचिव श्री प्रवीण पाटकर यांच्या मार्गदर्शनाने युवसेना उपविभाग अधिकारी विशाल परब यांनी दहावीच्या विध्यार्थ्यानी परीक्षेचा अभ्यास कसा करावा, वेळेचे नियोजन कसे करावे, झोप कशी आवश्यक  आहे, मानसिक स्वस्थ कसे राखावे,खाणे -पिणे यावर दुर्लक्ष करू नये इत्त्यादी विषयी मार्गदर्शनपर शिबीर जोगेश्वरीच्या बालविकास विद्या मंदिर शाळेत आयोजित केले होते. या शिबिरामध्ये माधवराव भागवत हायस्कूलचे व्याखाते श्री संदीप गीध यांनी मार्गदर्शन केले. सुमारे १००० विद्यार्थी या शिबिराला उपस्थित होते.

  या प्रसंगी उपविभागप्रमुख श्री विश्वनाथ सावंत, अनंत भोसले, शाखाप्रमुख श्री बाळा नर, सौ रचना सावंत, शैलजा नरवणकर, ज्ञानेश्वर सावंत, भाई मिर्लेकर,अनिल म्हसकर, उदय हेगीस्ते, नरेंद्र पेडणेकर, कालिदास कांदळगावकर, प्रकाश भोसले, स्वप्नील सुर्वे,संकेत शिंदे, योगित पाटील, धीरेन महाले, राजेश्री धुरी, अमित पेडणेकर शाखा अधिकारी -रुपेश कोळंबे, राकेश मुलुख, निलेश म्हात्रे, मनोज मेस्त्री, राहुल गाडवे,विजय पवार, अभिषेक मेडेकर, शशिकांत चीन्काते, शिवा मंचेकर, श्रीकांत बाबर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा