मेघालयातील विद्यापिठातील पी एच डी पदवी प्राप्त केलेल्या प्राध्यापकांच्या पदवीची पडताळणी करून कारवाई करण्याची मागणी
आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मेघालयमधील सी एम जे तसेच शिलॉंग या विद्यापीठामधून पी एच डी ची बनावट पदवी मिळवून मुंबई व महाराष्ट्रामधील विविध ठिकाणी प्राध्यापकांच्या हुद्द्यावर कार्यरत असलेल्या लोकांवर कारवाई करण्याबाबत आज लक्षवेधी मधील चर्चेत शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी शासनाला जाब विचारला . त्यांनी आपल्या भाषणामध्ये मेघालयाच्या राज्यपालांनी २ ० ० ९ साली वरील दोन विद्यापीठामधून पी एच डी पदवी मिळविलेल्या प्राध्यापकांची पदवी पडताळणी करून चौकशी करून दोषी ठरलेल्या सर्व संबंधितांवर कारवाई केली होती . ही पदवी सुमारे एक लाख ते चार लाखापर्यंत रुपये खर्च करून मिळविल्या होत्या .
तश्याच प्रकारे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील बोगस पी एच डी पदवी मिळविलेल्या प्राध्यापकांची पदवी पडताळणी करण्याकरिता यंत्रणा केली आहे का ? व जर असेल तर कोणती यंत्रणा कार्यरत आहे ? अश्याप्रकारची कारवाई सरकार करणार आहे का ? . महाराष्ट्र सरकार म्हणते कि महाराष्ट्रात केवळ ३ ५ च बोगस पदवीधारक आहेत परंतु प्रत्यक्षात सुमारे २ ० ० पी एच डी पदवी धारक आहेत त्यांना हुडकून काढून दोषीवर कारवाई करणार का ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा