मुंबई दि.१८ (प्रतिनिधी). शिवसेना आमदार रविन्द्र वायकर यांनी शहीद मेजर उन्नीकृष्णन यांच्या आई-वडिलांना त्यांच्या सायकल प्रवासाच्या समारोपप्रसंगी दिलेल्या वचनाप् रमाणे एक वर्षाच्या आत अखेर जोगेश्वरीतील कोकणनगर येथील उद्यानाला शहीद मेजर संदिप उन्नीकृष्णन उद्यान असे नाव दिले. व पूनमनगर जवळील उद्यानाला शहीद हेमंत करकरे उद्यान असे नामकरण करून प्रतापनगर येथील हिन्दु स्मशान भूमिला शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक स्वर्गीय राजेश्वर वामन रागिनवार यांचे नाव देण्यात आले. यावेळी तीन्ही समाजवीरांना श्रद्धांजली अर्पित करतांना काही नागरिकांच्या डोळ्यात अश्रुही भरून आले. शहीद हेमंत करकरे व शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन या उद्यानाच्या सुशोभीकरण करण्या करता शिवसेनेचे शाखा प्रमुख बाळा नर, उदय हेगिष्ठे, नरेंद्र पेडणेकर , नितिन कारले , विश्वनाथ घाडगे आणि उमेश गायकवाड यांनी खूप मेहनत केली दोन्हीं उद्यानाचे नामकरण आमदार श्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच स्वर्गीय राजेश्वर वामन रागिनवार हिंदू स्मशान भूमिचे लोकार्पण त्यांचे नातु कृणाल मदन रागिनवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रामुख्याने स्वर्गीय रागिनवार यांची कन्या सौ उज्वला शेट्टी, पुतण्या विकास प्रभाकर रागिनवार, भाऊ सुरेश वामन रागिनवार आणि जावई अरूण शेट्टी यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेचे उपविभागप्रमुख विश्वनाथ सावंत, अनंत भोसले, विभाग संघटक सौ साधना माने, उपविभाग संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, नगरसेवक सुरेश गांगण, माजी नगरसेवक प्रविण शिंदे,शाखा प्रमुख जयवंत लाड़, प्रदिप गांधी, सुभाष मांजरेकर,शिवसेना व्यापार विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, उप विभाग अध्यक्ष भाई मिर्लेकर,महिला शाखा संघटक शैलजा नरवणकर, मंजिरी परब, प्रियांका अम्बोलकर, नीलाक्षी भाबल, महिला संघटक धनंजय शेट्टी, तुषार सावंत, यशवंत वेदक, दिगंबर गुरव, संदिप वेदक, सुनिल म्हसकर, महेश लिंगायत, नंदू ताम्हणकर , गुरू ताम्हाणे, आरती धुरी आणि दत्ता पडवळ सहीत समस्त शिवसैनिक व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा