मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्वस्त दरात कांदा विक्री केंद्राचे उद्घाटन

   
    मुंबईतील वाढत्या महागाईमध्ये भरडल्या जाणाऱ्या सामान्य जनतेच्या  कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे खरोखरच डोळ्यात पाणी आणले आहे .  ७० रुपये किलो दराने कांदा खरेदी करणे म्हणजे खिश्याला आणखीनच भगदाड पडण्यासारखे आहे .  या सर्व गोष्टीचा विचार करून गरिबांना थोडासातरी दिलासा मिळावा म्हणून शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून दिला केवळ ३५ रुपये किलो म्हणजे अर्ध्या किमतीमध्ये कांदा लोकांना देण्याची व्यवस्था करण्यात आली या साठी कांदा विक्री केंद्र सुरु करण्यात आले व या कांदा विक्री केंद्राचे उद्घाटन युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी जोगेश्वरी पूर्वेकडील श्यामनगर येथील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिराजवळ करण्यात आले .  या प्रसंगी आदित्य ठाकरे म्हणाले कि , " वास्तविक हे काम सरकारचे असताना हे काम विरोधही पक्षाने केले आहे आता हे सरकार उलथून टाकायची वेळ आली आहे आणि हे काम जनतेनेच करावे . " व आमदार वायकर यांच्या सेवा कार्याचे कौतुक करून या  सेवेचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन त्याने केले . 
      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला विभाग संघटक सौ साधना माने , महिला उपविभाग संघटक रचना  सावंत , शालिनी सावंत , उपविभाग प्रमुख अनंत भोसले, विश्वनाथ सावंत , नगरसेवक जितेंद्र वाळवी, अनंत नर , मंजिरी परब, तसेच युवसेना सचिन प्रवीण पाटकर सर्व शाखाप्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा