मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

जोगेश्वरीत विकास कामांचा आढावा व चर्चा

 सर्वपक्षीय सभेला चांगला प्रतिसाद जोगेश्वरीत मराठी भाषा भवन  व नाट्यगृहासाठी  प्रयत्न 
              
       जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी, गोरेगाव व अंधेरी पूर्व विभागाचा विकास कामांचा आढावा घेण्यासाठी व त्यावर नागरिकांबरोबर, तसेच सर्व पक्षीय पदाधीकारीबरोबर चर्चा करून जोगेश्वरीचा विकास कसा अजून चांगल्या प्रकारे करता येईल याकरिता सभा आयोजित केली होती.  ही सभा जोगेश्वरी पूर्वेकडील इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केली होती.  
     या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत आपला परिसर व जोगेश्वरीचा पायाभूत विकास कसा व्हावयाला हवा याबद्दल आपली मते निर्भीडपणे मांडली.  यामध्ये इस्माईल युसुफ महाविद्यालयाचा विकास करण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्यात आला असून लवकरच खेळाचे मैदान, जोग्गिंग व धावण्यासाठी मार्ग, उद्यान, वेगवेगळ्या खेळाकरिता मैदाने, उद्यान, जेष्ठ नागरिकांसाठी चालण्याकरिता व बसण्याकरिता विशेष योजना तयार केली आहे. तसेच वृक्ष रोपण व संवर्धन , वाहतुकीची समस्या सोडवण्याकरिता विशेष योजना करून वाहतूक पोलीस व नागरी पोलीस यांच्या सैयुक्तं सहकार्याने वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्यात आली. रस्ते, उड्डाणपूल, पादचारी पूल यांची आखणी करण्यात आली.  श्री वायकर यांनी आमदार झाल्या पासून जोगेश्वरीमध्ये विकास कामांचा जो धडाका चालू ठेवला आहे त्यावर जनता बेहद खुश असून, अश्या प्रकारे नागरिक व शासनाचे अधिकारी यांच्याबरोबर एकत्र चर्चा करणारे असे पहिलेच आमदार आम्ही पहाट आहोत व असे आमदार लाभणे म्हणजे आम्ही आमचे भाग्य समजतो असे उत्स्फुर्तपणे नागरिकांनी आपली मते मांडली. युवकांनीही आपली मते मांडली. खेळाडू, कलाकार यांच्यासाठी सुद्धा विविध उपक्रम चालू असून अजून नवनवीन उपक्रम चालू करण्याबद्दल चर्चा करण्यात आली.
      या सभेच्या वेळी बृहन्मुंबई महानगर पालिका,बेस्ट प्रशासनाचे अधिकारी,पी.दब्लू. डी.चे अधिकारी,वाहतूक पोलीस निरीक्षक,जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठा पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्ग तसेच सर्व पक्षिया पदाधिकारी व जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील नागरिक बहुसंखेने उपस्थित होते.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा