आमदार श्री रवींद्र वायकर यांचा उपक्रम
(भाई मिर्लेकर ) महागाईच्या भडक्या मध्ये होरपळून निघालेल्या सर्व सामान्य जनतेला गगनाला भिडलेल्या भाज्याच्या भावामुळे फारच मोठा आर्थिक फटका बसत आहे .रोजच्या जेवणामध्ये निदान भाज्या तरी वाजवी दरात मिळाव्या ही गरज भागवण्यासाठी शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरीमधील जनतेकरिता स्वस्त व मस्त ताजी भाजी विक्री केंद्र उपलब्ध करून दिले . हे केंद्र श्यामनगर तलावाशेजारील गणेश मंदिर मंचावर आज दिनांक १ ४ जुलै पासून सुरु केले . या भाजी विक्री केंद्राचे उदघाटन सौ मनीषा रवींद्र वायकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले . बाजार भावापेक्षा कमी दरात भाज्या मिळण्याची खात्री देण्यात आल्यामुळे पहिल्याच दिवशी नागरिकांच्या प्रचंड गर्दीने केंद्राची सुरवात झाली .
याप्रसंगी महिला विभाग संघटक साधना माने, उपविभागप्रमुख विश्वनाथ सावंत, रचना सावंत, शालिनी सावंत, नगरसेवक जितेंद्र वळवी, मंजिरी परब, शाखाप्रमुख सुभाष मांजरेकर, प्रदीप गांधी, महिला शाखा संघटक शैलजा नरवणकर, प्रियांका अम्बोलकर, शिवसेना व्यापार विभागाचे भाई मिर्लेकर, अशोक वालम आदी पदाधिकारी उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा