महिलांना स्वतःचे संरक्षण स्वतःच करता यावे याकरिता जुडो - कराटे प्रशिक्षण शिबीर आमदार रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी पूर्वेकडील इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ मोकळ्या मैदानामध्ये दिनांक ७ सप्टेंबर २०१३ रोजी सायंकाळी आयोजित केले होते. सुप्रसिद्ध कराटेपटू पोलिस दलातील ग्रान्ड मास्टर श्री प्रकाश वाघ यांच्या सहकार्याने त्यांचे प्रशिक्षक कुमारी पायल वाघ , संदीप वाघ व सहकार्यांनी या शिबिरामध्ये महिलांनी स्व संरक्षण कसे करावे याकरिता जुजबी प्रशिक्षण दिले .
याप्रसंगी पोलिस उपायुक्त श्री अरुण चव्हाण , मेघवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री एस डी भंडारी उपस्थित होते . महिला विभाग संघटक साधना माने , रचना सावंत , उपविभाग प्रमुख विश्वनाथ सावंत, नगरसेवक अनंत नर , जितेंद्र वळवी , मंजिरी परब , आदी पदाधिकारी उपस्थित होते . या शिबिराचा लाभ घेण्याकरिता गृहिणी बरोबर महाविद्यालयीन मुलींचं जास्त संखेने उपस्थित होत्या .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा