जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी करिता मार्गदर्शन मेळावा आमदार श्री रवींद्र वायकर यांनी दिनांक २ ६ जून २० १ ३ रोजी जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड लगतच्या गणेश मंदिर हॉल मध्ये आयोजित केला होता . जनतेच्या सर्व प्रकारच्या सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक गरजांबरोबरच वैयक्तिक स्वरूपाची कामेही शिवसेनेच्या नगरसेवक , आमदारांच्या तसेच प्रत्तेक कार्यकर्त्याच्या माध्यमातून होत असतात त्या कामाचा पाठपुरावा प्रत्तेक पदाधिकार्यांनी काम तडीस नेईपर्यंत करायला हवा व . कोणत्याही पक्ष्याच्या , कोणत्याही जाती - धर्माच्या व्यक्ती चे काम शिवसेना करत असते तीच परंपरा पुढेही अधिक जोमाने चालू राहायला हवी असे वायकर म्हणाले. २ ० १ ४ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये श्री गजानन किर्तीकर यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याकरिता कार्यकर्त्यांनी कश्याप्रकारे झटायला हवे या विषयही विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करून काही पदाधिकाऱ्यानी कार्य करण्यामध्ये येणाऱ्या अडचणीही सांगितल्या .
सदर शिबिरास महिला विभाग संघटक साधन माने, उपविभाग संघटक शालिनी सावंत, रचना सावंत, उपविभागप्रमुख अनंतराव भोसले, विश्वनाथ सावंत नगरसेवक अनंत नर, जितेंद्र वळवी , मंजीरी परब , माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, सुरेश गांगण, आरे कॉलनीचे राजू शिंदे, पुरुष व महिला शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवासेना उपविभाग अधिकारी विशाल परब, स्वप्नील सुर्वे, अमित पेडणेकर , व्यापार विभागाचे भाई मिर्लेकर , उत्तर भारतीय मंचचे कैलाशनाथ पाठक, भारतीय विद्यार्थी सेनेचे कालिदास कांदळगावकर , ग्राहक कक्षाचे प्रकाश भोसले असे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा