सोमवार, २६ डिसेंबर, २०११

मुंबईतील दुसरे पंचतारांकित शौचालय


       शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर दुर्गानगर येथे बृहन्मुंबई महानगर पालीकेच्या माध्यमातून सुसज्ज असे पंचतारांकित शौचालय बांधून नुकतेच लोकार्पण केले. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाढत्या रहदारीचा व रोजच्या रोज वाहनांच्या वाढत्या संख्येचा विचार करून लिंक रोडवर प्रवाशांसाठी शौचालय होणे गरजेचे होते.  तसेच स्थानिक रहिवाश्यांसाठीही नितांत गरज होती या करिता आमदार श्री रवींद्र वायकर यांनी स्नानागृहयुक्त असे शौचालय बांधले.
       या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी स्थानिक राहिवाश्यांसह  शिवसेनेचे  महिला विभाग संघटक सौ साधना माने, उपविभागप्रमुख अनंत भोसले,विश्वनाथ सावंत, उपविभाग संघटक सौ रचना सावंत, शालिनी सावंत, शाखाप्रमुख बाळा नर, ज्ञानेश्वर सावंत, के एल पाठक, उदय हेगीस्ते, नरेंद्र पेडणेकर, भास्कर कोटियन, शाखाप्रमुख सुभाष मांजरेकर, भाई मिर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा