गुरुवार, ८ डिसेंबर, २०११

शिवसेनेच्या दणक्याने आरे पोलीस नरमले



उपायुक्त श्री राजेंद्र दाभाडे यांनी नव्याने एफ आई आर नोंदवून घेऊ व त्याला तडीपार करू असे आंदोलकांना आश्वासान दिले
गोरेगाव पूर्व येथील आरे युनिट क्रमांक ३२ या ठिकाणी राहत असलेल्या सचिन उर्फ सोन्या विवेक वानखेडे या २३ वर्ष्याचा नराधमाने दिनांक पाच डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शेजारच्या ९ वर्षाच्या मुलीला चौक्लेत देतो असे सांगून आपल्या घरी बोलून तिच्यावर अतिप्रसंग करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला त्या मुलीला बळजबरी करीत असताना तिने आरडओरड करून शेजारची एक मुलगी धावत आली तेव्हा शिताफीने तेथून सुटका करून घेतली.  मुलीची आई व शेजारी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेले व वैद्याकिया तपासणी करण्यात आली.  इतर सबळ पुरावे असून देखील पोलीसानी आरोपीवर किरकोळ कलम लाऊन सुट्टीच्या दिवशीच दुसर्या  दिवशी सहा तारखेला कोर्टामध्ये उभे करून जामीन मिळून दिला. सात तारखेला  जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार श्री रवींद्र वायकर यांना ही बाब समजल्यावर ते तत्काळ पोलीस ठाण्यावर पोहचले. वरिष्ठ निरीक्षक  श्री टोपे यांना जाब विचारल्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही.  म्हणून आज दिनांक आठ तारखेला आरे पोलीस ठाण्यावर शिवसेनेने निषेध व आरोपीला पुन्हा अटक करून नव्याने एफ आई आर नोंदवावा म्हणून मोर्चा काढला. शेवटी उपायुक्त श्री राजेंद्र दाभाडे यांनी चर्चा करून आरोपीची पुन्हा चौकशी करून त्याचावर नव्याने एफ आई आर नोंदवून घेऊ व त्याला तडीपार करू असे आंदोलकांना आश्वासान दिले.  साहायक उपायुक्त श्री मारुती राठोड यांनी मोर्चाला सामोरे जाऊन वरील प्रमाणे आश्वासन दिले.
या मोर्च्याचे नेतृत्व आमदार रवींद्र वायकर यांनी केले व सोबत सभागृह नेते श्री सुनील प्रभू, महिला विभाग संघटक सौ साधना माने, उपविभाग प्रमुख अनंत भोसले, विश्वनाथ सावंत, महिला उपविभाग प्रमुख शालिनी सावंत, रचना सावंत, शाखाप्रमुख श्री जनार्दन चव्हाण, महिला शाखा संघटक सौ नीलाक्षी भाबल, शाखाप्रमुख बाळा नर,  जयवंत लाड, गांधी, सुभाष मांजरेकर, के एल. फाटक,कालिदास कान्दाल्गावकर, ज्ञानेश्वर सावंत, भाई मिर्लेकर आदी पदाधिकारी,युवा सैनिक  व स्थानिक नागरिक प्रचंड संखेने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा