सोमवार, ५ डिसेंबर, २०११

जोगेश्वरीत शिवसेनेने लावले २५ आदिवासींचे लग्न



शिवसेना कार्याप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे, महाबली खली यांच्या उपस्थितीत 
   जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री रवींद्र वायकर यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील गरीब व गरजू अशा २५ आदिवासी जोडप्यांचे सामुदाईक विवाह सोहळा आयोजित केला होता अत्त्यंत पारंपारिक रित्या हा सोहळा करण्यात आला.  या विवाहितांना आशीर्वाद देण्याकरिता शिवसेना कार्याप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे , सौ रश्मी उद्धव ठाकरे आणि जागतिक पातळीचा सुप्रसिद्ध कुस्ती पेहेलवान महाबली खली यांनी हजर राहून कार्याक्रमाची शान वाढवली.  आमदार श्री रवींद्र वायकर यांनी आदिवासी जोडप्यांना सोन्याचे मंगळसूत्र, सौन्सारोपयोगी भांडी, वधूला साडी-चोळी, वराला पोशाख उपस्थितांना आईस्क्रीम व संपूर्ण लग्न समारोह आयोजन केले होते.  
     मुंबईमध्ये प्रथमच अश्या पद्धतीचा आदिवासींचा सामुदाईक लग्न सोहळा आयोजित केला होता अशी उपस्थितांमध्ये चर्चा होत होती. या विवाह सोहळ्यात शिवसेनेचे महिला विभाग संघटक सौ साधना माने, सभागृह नेता श्री सुनील प्रभू, उपविभाग प्रमुख अनंत भोसले, विश्वनाथ सावंत, महिला उपविभाग संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, नगरसेवक श्री शैलेश परब, श्री सुदेश गांगण,युवसेनेचे सचिव श्री प्रवीण पाटकर शाखाप्रमुख बाळा नर, जयवंत लाड,  परदीप गांधी, सुभाष मांजरेकर, ज्ञानेश्वर सावंत, भाई  मिर्लेकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक व आदिवासी बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा