मुंबई. जोगेश्वरी पूर्व येथील युवा सैनिकांनी ’नवोदित युवा श्री २०११’ या शरीर सौष्टव स्पर्धेचे भव्य आयोजन केले होते. त्यामधे शैकड़ो युवकांनी स्पर्धेत भाग घेऊन कार्यक्रमास भरपूर प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर आणि मिस्टर युनिवर्स आशिष साखरकर यांनी स्पर्धेत जिंकणाNया युवकांचे कौतूक करून त्यांना पारितोषिकाने संमानित केले.
आमदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेने चे झुजारू कार्यकर्ता विजय पवार व संकेत शिंदे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत किमान २५० पेक्षा जास्त युवकांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र संचालन मुंबई बॉड़ी बिल्डर असोसिएशचे सरचिटणिस सुनिल शेड़गे यांनी केले. या कार्यक्रमात मुख्यत: आमदार अभिजीत अड़सूल, विद्यार्थी सेनेचे संजय खोत, शिवसेना व्यापार विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, उपाध्यक्ष अॅडव्होकेट भाई मिर्लेकर, नगरसेवक सुरेश गांगण, शाखा प्रमुख जयवंत लाड़, प्रदिप गांधी, अमर मालवणकर इत्यादि मान्यवर उपस्थित होते. तर या कार्यक्रमास यशस्वी बनविण्यासाठी श्वेता मोरे, साजीद, रितेश देसाई, विवेक म्हात्रे, पार्वती पवार, गणेश गांधी व प्रशांत कदम या युवा कार्यकत्र्यांनी भरपूर परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा