सोमवार, ९ सप्टेंबर, २०१३

पोलिसांनी महिलांना स्वसंरक्षणाचे दिले धडे



   महिलांना स्वतःचे संरक्षण स्वतःच करता यावे याकरिता जुडो - कराटे प्रशिक्षण शिबीर आमदार रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी पूर्वेकडील इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ मोकळ्या मैदानामध्ये दिनांक ७ सप्टेंबर २०१३ रोजी सायंकाळी आयोजित केले होते.  सुप्रसिद्ध कराटेपटू पोलिस दलातील ग्रान्ड मास्टर श्री प्रकाश वाघ यांच्या सहकार्याने त्यांचे प्रशिक्षक कुमारी पायल वाघ , संदीप वाघ व सहकार्यांनी या शिबिरामध्ये महिलांनी स्व संरक्षण कसे करावे याकरिता जुजबी प्रशिक्षण दिले .  
   याप्रसंगी पोलिस उपायुक्त श्री अरुण चव्हाण , मेघवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री एस डी भंडारी उपस्थित होते .  महिला विभाग संघटक साधना माने , रचना सावंत , उपविभाग प्रमुख विश्वनाथ सावंत, नगरसेवक अनंत नर , जितेंद्र वळवी , मंजिरी परब , आदी पदाधिकारी उपस्थित होते . या शिबिराचा लाभ घेण्याकरिता गृहिणी बरोबर महाविद्यालयीन मुलींचं जास्त संखेने उपस्थित होत्या . 

शिक्षक स्नेह संमेलनाचे आयोजन


जोगेश्वरीत शिवसेनेने केला शिक्षकदिन साजरा
    शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील सर्व शालेय शिक्षक , मुख्यध्यापक , विश्वस्त यांचे स्नेह संमेलन सुप्रीमो सेंटर येथे शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी आयोजित केले होते. शिक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत शिक्षकांचा , मुख्याध्यापकांचा व शिक्षण संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव या प्रसंगी आमदार श्री रवींद्र वायकर यांनी केला . शिक्षकांनीच सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनमुराद आनंद उपस्थितांनी  घेतला . स्त्रियांची महती सांगणाऱ्या गीत व नृत्याच्या आविष्काराने सभागृह भरून गेले .  सतत तणावाखाली काम करत असणाऱ्या शिक्षकांना क्षणभर विविध कार्यक्रमामध्ये खेळामध्ये भाग घेऊन आनंद लुटला .  या प्रसंगी बोलताना आमदार वायकर म्हणाले कि हे संमेलन शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  आयोजिलेले आहे   विद्यार्थ्यांना घडविताना शिक्षकांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून शिवसेना त्यांच्या सोबत कायम राहील याचे आश्वासन दिले . 
   या कार्यक्रमामध्ये श्रमिक विद्यालय , अरविंद गंडभीर हायस्कूल , बांदिवली विद्या मंदिर , श्री समर्थ विद्यालय च्या शिक्षकांनी गीते व नृत्य सादर केली ,  या प्रसंगी श्रमिक विद्यालयाच्या संचालिका श्रीमती स्मिता चव्हाण यांना राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला व केंद्र शासनाने आयोजित केलेल्या इन्स्पायरेशन अवार्ड फॉर सायन्स एक्झिबिशन मध्ये बांदिवली विद्या मंदीर शाळेला नामांकन मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला अश्याप्रकारे अनेक मान्यवरांचा व विविध विषयात विशेष कामगिरी केल्याबद्दल अनेक शिक्षकांचा गौरव करण्यात आला. 
  या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष श्री नितीन चौधरी, बांदिवली विद्या मंदिरच्या ८२ वर्षीय माजी मुख्याध्यापिका सुंदर गोविंद पाटकर व देऊलकर सर , जोगेश्वरी एजुकेशन सोसायटीचे विश्वस्त मनोज फेणे , न्याशनल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मुमताज खान , बांदिवली विद्या मंदिरचे मुख्याध्यापक हेमंत पाटील व जयंत सोनावणे , अरविंद गंडभीर हायस्कूलच्या  मुख्याध्यापिका सौ माया पांगम , बालविकास विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका अपेक्षा खामकर , श्रमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता चव्हाण व मुख्याध्यापक नारायण चव्हाण , सेंट झेवियर्स हायस्कूलचे मुख्याध्यापक अल्फान्सो रोजरिओ , श्री समर्थ हायस्कूलच्यामुख्याध्यापिका अमृता धावडे , या मान्यवरांबरोबरच शिवसेनेच्या विभाग संघटक साधना माने, विश्वनाथ  सावंत, नगरसेवक अनंत नर , रचना सावंत , शालिनी सावंत  आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

जोगेश्वरीत इको - फ्रेंडली गणेशमूर्ती व मखरांचे उद्घाटन


गेल्या काही वर्ष्यामध्ये प्लास्टर ऑफ प्यारीसच्या मूर्त्यांच्या विसर्जनामुळे पर्यावरणाचा र्हास होत असल्यामुळे इको - फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका तसेच अनेक स्वयंसेवी संघटना आटोकाट प्रयत्न करीत आहेत . या मोहिमेला साथ देण्यासाठी जोगेश्वरी पूर्व इको - फ्रेंडली गणेशमूर्ती व मखरांचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .याचे उद्घाटन शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते आज दिनांक २१ ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी करण्यात आले .या प्रसंगी नगरसेवक श्री अनंत नर व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  हे प्रदर्शन २१ ( एकवीस )ऑगस्ट ते ८ सप्टेंबर पर्यंत असून जनतेसाठी हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे . 
      देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो . मोठ्या श्रद्धेने प्लास्टर ऑफ प्यारीसची गणेशमूर्ती घराघरामध्ये आणण्यात येते .  गणेशाच्या पुढे थर्माकोलची आरासही करण्यात येते . प्लास्टर ऑफ प्यारीसच्या मूर्तीच्या विसर्जनामुळे समुद्र , तलाव , विहिरीचे पाणी दुषित होते . बऱ्याचवेळा या मूर्ती पाण्यात पटकन विरघळत नसल्याने दुसरया दिवशी भग्नावशेषातील काही मूर्ती चौपाटीवर दिसून येतात .  या मूर्तींचे पुन्हा विसर्जन करावे लागते  तसेच पर्यावरणाला हानिकारक ठरणारा थर्माकोल सुद्धा कालांतराने टाकण्यात येत असल्याने पर्यावरणाला बाधा पोहचते .  यातून मार्ग काढण्यासाठी तसेच पाण्याचे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी इको - फ्रेंडली अश्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे प्रदर्शन ठिकठीकाणी भरविण्यात येत आहे . 
    इको - फ्रेंडली गणेशमूर्ती जनतेने खरेदी करून गणेशोत्सव साजरा करावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे .  याला साथ देण्यासाठी सिद्धिविनायका आर्ट तर्फे व स्थानिक आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोगेश्वरी पूर्व येथील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर मंच , श्यामनगर तलावाजवळ , जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड , येथे भरविण्यात आले आहे . 

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

महापौरांच्या हस्ते ई - लायब्ररीचे लोकार्पण

       

                जोगेश्वरी  पूर्व विभागाचे शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगर पालिकेच्या व दत्ताराम गोविंद वायकर ट्रस्ट यांच्या  माध्यमातून साकारलेले हे खास शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांकरिता भव्य व साहित्य साधनाने संपन्न असे ई - लायब्ररीचे रविवारी  दिनांक १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी मुंबईचे महापौर श्री सुनील प्रभू यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले .  या लायब्ररीमध्ये १५ संगणक वातानुकुलीत वातावरणामध्ये असून विध्यार्थ्यांना ज्ञानभांडार खुले करण्यात आलेले असून विविध विषयांवरील अभ्यासोपयोगी तसेच ऐतिहासिक, मान्यवरांचे चरित्र , सर्व सामान्य ज्ञान , अश्या अनेक क्षेत्रातील भरपूर पुस्तकेसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत .  मुलांना निवांत जागी अभ्यास करता यावा म्हणून एक स्वतंत्र दालन व गट चर्चेकरितासुद्धा  स्वतंत्र दालनाची व्यवस्था आहे. या बरोबरच जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा व मन रिझवावे याकरिता कॅरम , बुद्धिबळ  , असेच अनेक करमणुकीच्या साधनांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे  मोफत वृत्तपत्र वाचनाचा एक वेगळा कक्ष केला आहे. या सर्व साधनांचे उद्घाटन महापौर श्री सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.  या बरोबरच जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील एकूण ७ प्रभागामधील दहावी व बारावीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विध्यार्थ्यांचा महापौरांच्या व विभागप्रमुख आमदार डॉ  अनिल परब यांच्या व मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला .आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या कार्याचा संपूर्ण आलेख नागरिकांना कळावा व नागरिकांच्या तक्रारी व सूचनासुद्धा त्यांना कळाव्या म्हणून त्यांच्या  वेबसाईट चे उद्घाटन सुधा महापौरांच्या हस्ते करण्यात आले . श्रमिक विद्यालयाच्या स्काउट च्या विध्यार्थ्यानी सुंदर संचलन करून मान्यवरांचे स्वागत केले . 
                  या प्रसंगी बोलताना महापौरांनी आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरीचा कायापालट करण्याऱ्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या हातून अश्याचप्रकारच्या समाजोपयोगी कामाबाबत शुभेच्छा व्यक्त करून त्यांना महापौर या नात्याने आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगितले. या लायब्ररीचा शिक्षण क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्या व प्रतिकूल परीस्थित शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांनी या विद्यार्जन वास्तूचा पुरेपूर लाभ घ्यावा असेही महापौर म्हणाले .   मुंबईमध्ये अश्याप्रकारच्या सुमारे २५० लायब्ररी पुढील काही वर्ष्यात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात येतील असेही सांगितले. 
              या प्रसंगी विभागप्रमुख Advocate अनिल परब , महिला विभाग संघटक साधना माने , युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर , युवासेना सचिव प्रवीण पाटकर, उपविभाग प्रमुख विश्वनाथ सावंत , अनंत भोसले,उपविभाग संघटक शालिनी सावंत, रचना सावंत ,नगरसेवक अनंत नर, जितेंद्र वळवी , मंजिरी परब ,माजी नगरसेवक प्रवीण शिंदे ,  सुरेश गांगण, सर्व शाखाप्रमुख व सलग्न संघटनांचे पदाधिकारी व विध्यार्थी व पालकवर्ग, जेष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्वस्त दरात कांदा विक्री केंद्राचे उद्घाटन

   
    मुंबईतील वाढत्या महागाईमध्ये भरडल्या जाणाऱ्या सामान्य जनतेच्या  कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे खरोखरच डोळ्यात पाणी आणले आहे .  ७० रुपये किलो दराने कांदा खरेदी करणे म्हणजे खिश्याला आणखीनच भगदाड पडण्यासारखे आहे .  या सर्व गोष्टीचा विचार करून गरिबांना थोडासातरी दिलासा मिळावा म्हणून शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून दिला केवळ ३५ रुपये किलो म्हणजे अर्ध्या किमतीमध्ये कांदा लोकांना देण्याची व्यवस्था करण्यात आली या साठी कांदा विक्री केंद्र सुरु करण्यात आले व या कांदा विक्री केंद्राचे उद्घाटन युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी जोगेश्वरी पूर्वेकडील श्यामनगर येथील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिराजवळ करण्यात आले .  या प्रसंगी आदित्य ठाकरे म्हणाले कि , " वास्तविक हे काम सरकारचे असताना हे काम विरोधही पक्षाने केले आहे आता हे सरकार उलथून टाकायची वेळ आली आहे आणि हे काम जनतेनेच करावे . " व आमदार वायकर यांच्या सेवा कार्याचे कौतुक करून या  सेवेचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन त्याने केले . 
      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला विभाग संघटक सौ साधना माने , महिला उपविभाग संघटक रचना  सावंत , शालिनी सावंत , उपविभाग प्रमुख अनंत भोसले, विश्वनाथ सावंत , नगरसेवक जितेंद्र वाळवी, अनंत नर , मंजिरी परब, तसेच युवसेना सचिन प्रवीण पाटकर सर्व शाखाप्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते .

जोगेश्वरीत विकास कामांचा आढावा व चर्चा

 सर्वपक्षीय सभेला चांगला प्रतिसाद जोगेश्वरीत मराठी भाषा भवन  व नाट्यगृहासाठी  प्रयत्न 
              
       जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी, गोरेगाव व अंधेरी पूर्व विभागाचा विकास कामांचा आढावा घेण्यासाठी व त्यावर नागरिकांबरोबर, तसेच सर्व पक्षीय पदाधीकारीबरोबर चर्चा करून जोगेश्वरीचा विकास कसा अजून चांगल्या प्रकारे करता येईल याकरिता सभा आयोजित केली होती.  ही सभा जोगेश्वरी पूर्वेकडील इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केली होती.  
     या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत आपला परिसर व जोगेश्वरीचा पायाभूत विकास कसा व्हावयाला हवा याबद्दल आपली मते निर्भीडपणे मांडली.  यामध्ये इस्माईल युसुफ महाविद्यालयाचा विकास करण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्यात आला असून लवकरच खेळाचे मैदान, जोग्गिंग व धावण्यासाठी मार्ग, उद्यान, वेगवेगळ्या खेळाकरिता मैदाने, उद्यान, जेष्ठ नागरिकांसाठी चालण्याकरिता व बसण्याकरिता विशेष योजना तयार केली आहे. तसेच वृक्ष रोपण व संवर्धन , वाहतुकीची समस्या सोडवण्याकरिता विशेष योजना करून वाहतूक पोलीस व नागरी पोलीस यांच्या सैयुक्तं सहकार्याने वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्यात आली. रस्ते, उड्डाणपूल, पादचारी पूल यांची आखणी करण्यात आली.  श्री वायकर यांनी आमदार झाल्या पासून जोगेश्वरीमध्ये विकास कामांचा जो धडाका चालू ठेवला आहे त्यावर जनता बेहद खुश असून, अश्या प्रकारे नागरिक व शासनाचे अधिकारी यांच्याबरोबर एकत्र चर्चा करणारे असे पहिलेच आमदार आम्ही पहाट आहोत व असे आमदार लाभणे म्हणजे आम्ही आमचे भाग्य समजतो असे उत्स्फुर्तपणे नागरिकांनी आपली मते मांडली. युवकांनीही आपली मते मांडली. खेळाडू, कलाकार यांच्यासाठी सुद्धा विविध उपक्रम चालू असून अजून नवनवीन उपक्रम चालू करण्याबद्दल चर्चा करण्यात आली.
      या सभेच्या वेळी बृहन्मुंबई महानगर पालिका,बेस्ट प्रशासनाचे अधिकारी,पी.दब्लू. डी.चे अधिकारी,वाहतूक पोलीस निरीक्षक,जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठा पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्ग तसेच सर्व पक्षिया पदाधिकारी व जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील नागरिक बहुसंखेने उपस्थित होते.  

आरे कॉलनीत केला आदिवासी दिन साजरा

आदिवासी मुलांना IAS / IPS अधिकारी होण्यासाठी सहकार्य करण्याचे दिले वचन 
      जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी दिनांक ९ ऑगस्ट २०१३ रोजी गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील २ ७ आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासी दिन साजरा केला .  खांबाचा पाडा येथे आदिवासी एकत्र जमून एक आगळा वेगळा आदिवासी दिनानिमित्त सोहळा साजरा करण्यात आला . अजूनही काही आदिवासी पाडे विजेविना अंधारात असून तेथे येत्या दिवाळीपूर्वी विजेचा पुरवठा करण्यात येईल असे श्री वायकर यांनी सांगून आदिवासी विध्यार्थाना शिक्षण घेण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे वचन  देऊन आदिवासी मुलांमध्ये IAS / IPS अधिकारी होण्याचीही क्षमता असते त्यांनी भरपूर अभ्यास करून उच्च पदस्य ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून जावे त्यासाठी सर्वतोपरी आर्थिक मदतीसह शिवसेना सहाय्य करेल असे आश्वासन व वचन  दिले .  प्रत्तेक आदिवासी पाड्यावर पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याचे काम सुरु असून लवकरच ते पुर्णस्त्वास जाइल असे सांगितले . या आदिवासी दिनी सर्व आदिवासी बांधवाना भेटवस्तू व मिठाई देऊन त्यांचे कौतुक केले व त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या . 

  या प्रसंगी स्थानिक नगरसेवक श्री जितेंद्र वळवी आदिवासी कार्यकर्ते लखमा पागे , उपविभागप्रमुख विश्वनाथ सावंत, अनंत भोसले , शालिनी सावंत, नगरसेवक अनंत नर , उदय हेगीस्ठे  , जनार्दन चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भव्य आरोग्य शिबीर व मोफत औषधे वाटप





 मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य अभियानाचा उपक्रम 

       जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री रवींद्र वायकर आयोजित भव्य आरोग्य शिबीर सम्पन्न  झाले  . मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून नगरसेवक श्री अनंत नर यांच्या प्रभाग क्रमांक ६ ८ मधील श्यामनगर तलावाजवळ हे भव्य शिबीर आयोजित केले होते .  मुबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ मनीषा म्हैसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ  अनिल बामणे ,  सहाय्यक आयुक्त सौ भाग्यश्री कापसे  यांनी या शिबिराला भेट देऊन पाहणी केली .  या शिबिरामध्ये माहिती , शिक्षण व संपर्क विभागाने मलेरियाचा फैलाव होऊ नये म्हणून कोण कोणते उपाय योजावेत याचे प्रात्यक्षिक व प्रदर्शनाद्वारे नागरिकांना उपयुक्त  कीटक नियंत्रण विभागाचे प्रमुख अधिकारी श्री संदीप तांडेल यांनी विशेष माहिती दिली   पावसाळ्यात कोणकोणत्या प्रकारचे डास  असतात व नागरिकांनी डास  होऊ नयेत व डासांवर कश्याप्रकारे नियंत्रण ठेवता येते हे सांगितले .  वैद्यकीय अधिकारी डॉ  भूपेंद्र पाटील व नायर रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ  रमेश हरमल यांनी त्यांचा वैद्यकीय ताफा व औषध्यांचा साठा  या शिबिराकरिता आणला होता . 
        या शिबिरामध्ये सुमारे चारशे रुग्णांनी विविध प्रकारच्या आरोग्य सुविधांचा लाभ घेतला .  मधुमेह , क्षयरोग,   त्वचारोग , बालरुग्ण  अश्या विविध रोगांवर उपचार करण्यात आले या करिता डॉ  प्रेरणा मुजुमदार , डॉ  मिलिंद फिरंगे  डॉ  विनायक जाधव , डॉ  नविना  लोटणकर यांनी विशेष सहकार्य केले .  या प्रसंगी उप कार्यकारी अधिकारी डॉ मंगला गोमारे , डॉ  एस के  मदने,डॉ  सिद्धिकी , शिवसेनेचे महिला विभाग संघटक साधना माने , उपविभागप्रमुख विश्वनाथ सावंत , अनंत भोसले, नगरसेवक अनंत नर , जितेंद्र वळवी , महिला उपविभाग संघटक सुमंगल कोलथरकर ,शालिनी सावंत , रचना सावंत,शाखा संघटक शैलजा नरवणकर , प्रियांका अम्बोलकर ,शाखाप्रमुख जयवंत लाड , सुभाष मांजरेकर , शिवसेना व्यापार विभागाचे उपविभाग अध्यक्ष श्री भाई मिर्लेकर , उदय हेगीस्टे , नंदकुमार ताम्हणकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

अंधेरी पूर्वेकडील सेंट झेवियर्स हायस्कूलने केला पर्यावरण जागृती सप्ताह साजरा

      
   सेंट झेविएर ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक डॉ . अगस्तीन फ्रान्सिस पिंटो यांच्या संकल्पनेने अंधेरी पूर्वेकडील पुनम नगर येथील सेंट झेवियर्स हायस्कूल चे प्रिन्सिपल श्री अल्फान्सो रोजरिओ यांनी शाळेच्या विध्यार्थांकडून पर्यावरण जागृती साप्ताह साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले .   पर्यावरणाचे महत्व पटविण्यासाठी विविध उपक्रम राबविले.  त्यामध्ये वृक्षारोपण , पाणीबचत , इंधनबचत, वीज बचत , कागदांचा पुनर्वापर इत्यादी विषयक माहितीपर पथनाट्य , व्याखान , संभाषण, चर्चासत्र, अश्या विविध माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्रम राबविला .या गो ग्रीन ( GO GREEN ) च्या प्रचारासाठी विध्यार्थ्यानी आजूबाजूच्या परिसरामधील रहिवाश्यांना या विषय माहिती देऊन प्रात्यक्षिके दाखीविली. या प्रसंगी नगरसेवक अनंत नर व विश्वनाथ सावंत , अनंत भोसले , कैलाशनाथ पाठक, अशोक वालाम आदी  पदाधिकारी उपस्थित होते

शुक्रवार, १९ जुलै, २०१३

बोगस पी एच डी पदवीधारक प्रध्यापाकाबाबत लाक्षावेधीमध्ये आमदार श्री रवींद्र वायकर यांनी सरकारला विचारला जाब

मेघालयातील विद्यापिठातील  पी एच डी पदवी प्राप्त केलेल्या प्राध्यापकांच्या पदवीची पडताळणी करून कारवाई करण्याची मागणी 

  आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मेघालयमधील सी एम जे तसेच शिलॉंग या विद्यापीठामधून पी एच डी ची बनावट पदवी मिळवून मुंबई व महाराष्ट्रामधील विविध ठिकाणी प्राध्यापकांच्या हुद्द्यावर कार्यरत असलेल्या लोकांवर कारवाई करण्याबाबत आज लक्षवेधी मधील चर्चेत शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी शासनाला जाब विचारला .  त्यांनी आपल्या भाषणामध्ये मेघालयाच्या राज्यपालांनी २ ० ० ९ साली वरील दोन विद्यापीठामधून पी एच डी पदवी मिळविलेल्या प्राध्यापकांची पदवी पडताळणी करून चौकशी करून दोषी ठरलेल्या सर्व संबंधितांवर कारवाई केली होती . ही पदवी सुमारे एक लाख ते चार लाखापर्यंत रुपये खर्च करून मिळविल्या होत्या . 
    तश्याच प्रकारे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील बोगस  पी एच डी पदवी मिळविलेल्या प्राध्यापकांची पदवी पडताळणी करण्याकरिता यंत्रणा केली आहे का ? व जर असेल तर कोणती यंत्रणा कार्यरत आहे ? अश्याप्रकारची कारवाई सरकार करणार आहे का ? .  महाराष्ट्र सरकार म्हणते कि महाराष्ट्रात केवळ ३ ५ च बोगस पदवीधारक आहेत परंतु प्रत्यक्षात सुमारे २ ० ० पी एच डी पदवी धारक आहेत त्यांना हुडकून काढून दोषीवर कारवाई करणार का ? 

डीम कन्वेन्सबाबत ( मानीव अभिहस्तांतरण ) आमदार रवींद्र वायकर यांच्या सूचनांचे सरकारने केले स्वागत


पावसाळी अधिवेशन गृहनिर्माण सोसायट्यांच्या पथ्यावर 

   आज दिनांक १ ७ जुलै २ ० १ ३  रोजीच्या अधिवेशनामध्ये डीम कन्वेन्सबाबत मांडलेल्या लाक्षवेधीमधील चर्चेत शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी भाग घेऊन तीन महत्वाच्या सूचना मांडल्या व संबंधित गृहनिर्माण राज्यमंत्री श्री सचिन अहिर यांनी श्री वायकर यांच्या तीनही सूचनांचे स्वागत केले व या महत्वाच्या सूचना शासनाच्या विचाराधीन असतील व  यातून सकारात्मक प्रयत्नही करू असे शासनामार्फत आश्वासन दिले . 
   सरकारने जाहीर केलेल्या या डीम कन्वेन्सबाबत सुरवातीला गृहनिर्माण संस्थाना दिलासा मिळाला परंतु यातील प्रक्रियेमधील अनेक जाचक अटी व शर्तींची पूर्तता करता करता सोसायटीच्या नाकी नऊ येऊ लागून हळू हळू उत्साह कमी होऊन सोसायट्या याबाबत निरुत्साही होऊ लागल्या व ही सरकारची योजना फेल ठरली याकरिता आज लाक्षावेधीमध्ये आमदार रवींद्र वायकर यांनी चर्चेत भाग घेऊन सांगितले कि
 १ ) यापूर्वी या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संस्थाना अनेकप्रकारचे कागदपत्र गोळा करावे लागत व ते काम मुश्किल ठरायचे त्यातील जमीन मालक व विकासक यांच्यातीलच संबंधित कागदपत्र मागवावेत . 
२ )  या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संस्थाना डीम कन्वेन्स करिता भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्क भरण्याकरिता सुद्धा पुष्कळ धावपळ करावी लागते व चालू बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क आकारले जाते ह्या कारणास्तव देखील सोसायट्या याबाबत निरुत्साही होऊ लागल्या म्हणून सरकारने यापुढे ज्यावेळी नोंदणी केली गेली त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क आकारावे व  एक खिडकी योजना राबवावी . 
३ )  या करिता अभय योजना कार्यान्वित करून मुदतही देण्यात यावी . 
             अश्याप्रकारच्या महत्वाच्या ३ सूचना श्री रवींद्र वायकर यांनी आज लक्षवेधीच्या चर्चेच्या वेळी मांडल्या .

विध्यार्थ्यांच्या रखडलेल्या शिष्यवृत्त्या दोन महिन्यात मिळणार

      आज दिनांक १ ८ जुलै २ ० १ ३ रोजी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी  अधिवेशनामध्ये प्रशनोताराच्या तासामध्ये इयत्ता ७ वी ते १ ० वी च्या विद्यार्थ्यांना २ ० ० ९  पासून शिष्यवृत्त्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही हा प्रश्न चर्चेला आला असता शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी संबंधीत शालेय शिक्षण राज्यमंत्री मा  फौजिया खान यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या  कि,  शासनाकडून शिष्यवृत्त्याची रक्कममंजूर झालेली आहे परंतु काही तांत्रिक कारणामुळे विध्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही . त्यावर वायकर यांनी विचारले कि ज्या अधिकाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना रक्कम मिळालेली नाही त्याच्यावर कारवाई करणार का ? व विद्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृत्त्याची रक्कम केव्हा मिळणार ? यावर राज्यमंत्री म्हणाल्या कि चौकशी करून पुढील दोन महिन्यामध्ये मुलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल . 

जोगेश्वरी विधानसभेची हैटट्रीक !


सलग तिस-या वर्षी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यात उत्कृष्ट कामगिरीसाठी जोगेश्वरी विधानसभेला सन्मानित करण्यात आले. शिवसेना नेते व अध्यक्ष श्री.सुधीरभाऊ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या २० व्या वर्धापनदिनी शिवसेना नेते श्री.लीलाधरजी डाके यांच्या हस्ते हा सन्मान स्विकारताना जोगेश्वरी विधानसभेचे कक्षप्रमुख श्री. प्रकाश भोसले सोबत सरचिटणीस श्री.अरुण जगताप, खजिनदार श्री.अशोक शेंडे, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. राजू पाटील, श्री. विजय मालणकर, डॉ.राजस राणे, श्री.निखिल सावंत, मध्य कार्यालयप्रमुख श्री.निलकंठ तायडे.

सोमवार, १५ जुलै, २०१३

आदिवासी पाड्यांमध्ये प्रकाश पडणार

आरे कोलोनी तील आदिवासी पाड्यात आमदार रवींद्र वायाकर यांच्या प्रयत्नाने जनतेच्या घरात लाईट ची सोय करण्यात आली.

   पिढ्यान् पिढ्या पायाभूत सुविधांसाठी विजेअभावी अंधारात राहिलेले आदिवासी पाडे उजळणार आहेत. आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नामुळे आरे कॉलनीतील युनिट १७ समतानगरमध्ये रिलायन्सच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्याच्या केबल टाकण्याच्या कामाचे उद्घाटन आज वायकर यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी शाखाप्रमुख अजित भोगले, शाखा संघटक जयश्री सावंत, महिला उपशाखा संघटक अंतापूरकर, अनुरुद्र नारकर, प्रसाद कदम आदी उपस्थित होते.

जोगेश्वरीत शिवसेनेचे स्वस्त - मस्त भाजी विक्री केंद्र


आमदार श्री रवींद्र वायकर यांचा उपक्रम
   (भाई मिर्लेकर ) 
    महागाईच्या भडक्या मध्ये होरपळून निघालेल्या सर्व सामान्य जनतेला गगनाला भिडलेल्या भाज्याच्या भावामुळे फारच मोठा आर्थिक फटका बसत आहे  .रोजच्या जेवणामध्ये निदान भाज्या तरी वाजवी दरात मिळाव्या ही गरज भागवण्यासाठी शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरीमधील जनतेकरिता स्वस्त व मस्त ताजी भाजी विक्री केंद्र उपलब्ध करून दिले .  हे केंद्र श्यामनगर तलावाशेजारील गणेश मंदिर मंचावर आज दिनांक १ ४ जुलै पासून सुरु केले .  या भाजी विक्री केंद्राचे उदघाटन सौ मनीषा रवींद्र वायकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले .  बाजार भावापेक्षा कमी दरात भाज्या मिळण्याची खात्री देण्यात आल्यामुळे पहिल्याच  दिवशी नागरिकांच्या  प्रचंड गर्दीने केंद्राची सुरवात झाली . 

  याप्रसंगी महिला विभाग संघटक साधना माने, उपविभागप्रमुख विश्वनाथ सावंत, रचना सावंत, शालिनी सावंत, नगरसेवक जितेंद्र वळवी, मंजिरी परब, शाखाप्रमुख सुभाष मांजरेकर, प्रदीप गांधी, महिला शाखा संघटक शैलजा नरवणकर, प्रियांका अम्बोलकर, शिवसेना व्यापार विभागाचे भाई मिर्लेकर, अशोक वालम  आदी पदाधिकारी उपस्थित होते . 

शनिवार, १३ जुलै, २०१३

महागाईच्या दिवसात सर्व सामान्यांना दिलासा

आमदार श्री रवींद्र वायकर यांचा उपक्रम 

स्वस्त दरात मस्त भाजी विक्री केन्द्र 
(अनिल म्हसकर )
     महागाईने अगोदर हैराण झालेल्या नागरिकांना निदान पोटाची भूक शमविता यावी यासाठी अत्यंत माफक दरात स्वच्छ व ताज्या भाज्या उपलब्ध करून देण्याचा नवीन संकल्प आमदार रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी विधान सभेतील नागरिकांसाठी दिलासा देणारा उपक्रम दिनांक १ ४ जुलै २ ० १ ३  रोजी संध्याकाळी ४ वाजता इच्छापूर्ती गणेश मंदिर स्टेज ,श्यामनगर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथे सुरु होत आहे तरी या सेवेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे जनसंपर्क कार्यालयातून दिलेल्या प्रसिद्धी पत्रक मधून कळविण्यात आले आहे तरी या कार्यक्रमास सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे .

पुन्हा शिवसेनेने पाडला टोळ बंद


डेअरी आयुक्तांनी तत्काळ रस्ता दुरुस्तीचे दिले आश्वासन

५ ते १० वी च्या मुलांनासाठी मोफत शिकवणी

   सद्गुरू साईनाथ प्रतिष्टान ट्रस्ट च्या वतीने आरे कॉलोनी विभागातील गरीब व गरजू मुलां करिता आदर्श नगर आरे मिल्क कॉलोनी साईबाबा मंदिर येथे इयत्ता ५वि ती १०वि .च्या मुलांनासाठी मोफत शिकवणी वर्ग चालू करण्यात आले आहे. सदर कल्पना आरे कॉलोनी विभागातील श्री राजू शिंदे (शिवसेना चित्रपट सेना -चिटणीस )यांनी सुचवली. श्री श्याम कटारा, श्री हरीलाल प्रजापती ,श्री शशिकांत चव्हाण ,श्री विवेक तायशेटे,श्री रफिक शेख,महेद्र धिवरे,श्रीसंदीप भोसले, यांना हि कल्पना आवडली आणि या मोफत शिकवणी वर्गाला सुरवात झाली .सदर  शिकवणी वर्गात जवळ जवळ ६५ते ७० मुले मोफत  शिक्षणाचा लाभ घेत आहेत .
   सदर  शिकवणी वर्गात इंग्रजी विषयासाठी पूजा शिंदे, गणित विषयासाठी श्री कल्याण मुजामुले, मराठी, इतिहास भूगोल,भूमिती या विषयासाठी श्री नामदेव झिंगाडे यांचे मोलाचे योगदान लाभत आहे. मोफत  शिक्षणवर्गात मुलांन कडून एक रूपया सुद्धा घेतला जात नाही याची कृपया नोंद घ्यावी.  समाजातील तळागाळातील मुले खूपखूप शिकावी हीच एककळकळीची भावना.

आज आरे कॉलनीत टोळ बंद आंदोलन

महत्वाची सूचना
    वारंवार रस्त्यांचे पुनर्बांधणीची मांगणी करूनही राज्य सरकार व आरे प्रशासन लोकांच्या प्रश्नांना टाळमचाळ करीत असून बेकायदेशीर प्रवाश्यांकडून टोळ वसूल करीत आहे. शिवसेने तर्पेâ आरे प्रशासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आधी रस्ते सुधारा नंतर टोळ वसूल करा असे परिपत्रक देऊनही त्यांंनी टोळ अद्याप बंद केले नाही. याकरिता आज शनिवार दिनांक १३ जुलै २०१३ रोजी शिवसेने तर्पेâ पुन्हा एकदा सकाळी ११ वाजता आरे कॉलनी येथे टोळ बंद आंदोलन पुकारण्यात येत आहे. तरी सर्व शिवसैनिकांना व नागरिकांना या आंदोलनात सामिल होण्याचे निवेदन आमदार रवींद्र वायकर यांनी केले आहे. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.

जोगेश्वरीत शिवसेनेचा कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा संपन्न

       
            
      जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी करिता  मार्गदर्शन मेळावा आमदार श्री रवींद्र वायकर यांनी दिनांक २ ६ जून २० १ ३  रोजी जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड लगतच्या गणेश मंदिर हॉल मध्ये आयोजित केला होता . जनतेच्या सर्व प्रकारच्या सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक गरजांबरोबरच वैयक्तिक स्वरूपाची कामेही शिवसेनेच्या नगरसेवक , आमदारांच्या तसेच प्रत्तेक कार्यकर्त्याच्या माध्यमातून होत असतात त्या कामाचा पाठपुरावा प्रत्तेक पदाधिकार्यांनी काम तडीस नेईपर्यंत करायला हवा व  . कोणत्याही  पक्ष्याच्या  , कोणत्याही जाती - धर्माच्या  व्यक्ती चे काम शिवसेना करत असते तीच परंपरा पुढेही अधिक जोमाने चालू राहायला हवी असे वायकर म्हणाले. २ ० १ ४  च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये श्री गजानन किर्तीकर यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याकरिता कार्यकर्त्यांनी कश्याप्रकारे झटायला हवे या विषयही विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करून काही पदाधिकाऱ्यानी कार्य करण्यामध्ये येणाऱ्या अडचणीही सांगितल्या .  
      सदर शिबिरास महिला विभाग संघटक साधन माने, उपविभाग संघटक शालिनी सावंत, रचना सावंत, उपविभागप्रमुख अनंतराव भोसले, विश्वनाथ सावंत   नगरसेवक अनंत नर, जितेंद्र वळवी , मंजीरी परब , माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, सुरेश गांगण, आरे कॉलनीचे राजू शिंदे, पुरुष व महिला शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवासेना उपविभाग  अधिकारी विशाल परब, स्वप्नील सुर्वे, अमित पेडणेकर , व्यापार विभागाचे भाई मिर्लेकर , उत्तर भारतीय मंचचे कैलाशनाथ पाठक, भारतीय विद्यार्थी सेनेचे कालिदास कांदळगावकर , ग्राहक कक्षाचे प्रकाश भोसले असे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते