जोगेश्वरी विधानसभा कला-क्रीडा महोत्सव-२०११
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी आयोजित केलेल्या कला-क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ दिनांक ४ डिसेंबर २०११ रोजी शिवसेना कार्याप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे व महाबली खली यांच्या शुभ हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलन करण्यात आले. सौ रश्मी उद्धव ठाकरे उपस्थित होत्या. जोगेश्वरी, गोरेगाव व अंधेरी विभागातील जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील कला क्रीडा रसिकांना या महोत्सवात भाग घेतला आहे. शाळांमधील विध्यार्थी या महोत्सवात मोठ्या संखेने भाग घेतला असून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांनी विविध खेळांमध्ये भाग घेतला आहे. विजेत्यांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.या प्रसंगी विविध शाळेमधील विद्यार्थी, शिक्षकवर्ग, क्रीडा रसिक व शिवसेना-भाजपा-आर पी आई चे पदाधिकारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा