मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

शिवसेनेच्या आमदाराने रस्त्याला दिले कॉंग्रेसच्या दिवंगत कार्यकर्त्याचे नाव

(भाई मिर्लेकर)
    शिवसेना कधीही जात - पात, धर्म,व पक्ष याचा कधीही भेदभाव मानत नाही हे शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी  पूनमनगर येथे रस्त्याला कॉंग्रेसच्या एका कट्टर कार्यकर्त्याचे नाव देऊन गौरव केला व समाजाला दाखऊन दिले कि शिवसेनेचे नगरसेवक, आमदार व खासदारही कोणताही भेदभाव न ठेवता समाजाचे काम करत असतात. कैलासवासी शंकरराव महाडिक हे जवळजवळ ३५ ते ४० वर्षापासून कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते.  जोगेश्वरीचा विकास हाच त्यांनी ध्यास घेऊन सतत काम करत असत. त्यांची दोन्ही मुले वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करत असूनदेखील त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने आमदार श्री रवींद्र वायकर यांनी मुंबई महानगर पालीकेमधून एस. आर. महाडिक यांचे नाव रस्त्याला देण्यासाठी मंजूर करून घेतले याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.  या रस्त्याचा नामकरण सोहळ्याच्या वेळी सर्व पक्ष्याचे लोक आवर्जून उपस्थित होते.  कै. एस.आर.महाडिक यांचा मोठा मुलगा राजेंद्र हा मनसे मध्ये कार्यरत असून छोटा मुलगा संजय हा शिवसेनेमध्ये कार्यरत आहे.  त्यांचे सर्व कुटुंब या सोहळ्याने आनंदित झाले आहेत.
   या प्रसंगी श्री खरात मास्तर , सुधाकर पावसकर,दिवाकर सावंत, भाई मले, आर पी आयचे तालुका अध्यक्ष श्री दयानंद उन्मिक,माजी नगरसेवक श्री प्रवीण शिंदे, विभाग संघटक सौ साधना माने, उपविभाग प्रमुख अनंत भोसले, विश्वनाथ सावंत, रचना सावंत, शालिनी सावंत, शाखाप्रमुख बाळा नर, सुभाष मांजरेकर,प्रियांका अम्बोलकर, वैशाली भिंगार्डे, ज्ञानेश्वर सावंत, उदय हेगीस्थे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा