सोमवार, १२ डिसेंबर, २०११

जोगेश्वरीतील शिवटेकडीच्या लोकांना ९ इंच जलवाहिनी



आमदार श्री रवींद्र वायकर यांनी सोडवला पाण्याचा प्रश्न
   
जोगेश्वरी पूर्वेकडील वार्ड क्रमांक ६७ मधील शिव टेकडी या उंचावरील जागेवरील रहिवाश्यांना गेले कित्तेक वर्षापासून पाण्याचा प्रश्नाने ग्रासले होते.  उंचावरील भाग असल्यामुळे पाण्याचा दाबही कमी पडत होता त्यामुळे घड्याळाचा काट्यावर लोकांना मिनिटे लाऊन पाणी भरावे लागत होते.  पाण्यावरून आपापसात लोकांची भांडणे होत होती.  यावर कायमचा उपाय योजने गरजेचे होते.  शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी वेरवली जलाशयावरून निळ्या रंगाची एम डी पी १८ इंचाची जलवाहिनी टाकून घेतली व या जालावाहीनिमधून ९ इंचाची जलवाहिनी या शिवटेकडीच्या लोकांकरिता जोडून देण्याच्या कामाचा नुकताच  स्थानिक रहिवाश्यांचा हस्ते शुभारंभ केला. स्थानिक नगरसेवक श्री सुरेश गांगण यांनी सतत पाठपुरावा करून जलवाहिनी मंजूर करून घेतली. या जलवाहिनीचा कामामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून काही दिवसातच पाण्याची समस्या सुटणार असल्याने नागरिक शिवसेनेच्या आमदारांना दुवा देत आहेत.  या प्रसंगी विभाग संघटक सौ साधना माने, उपविभाग प्रमुख श्री विश्वनाथ सावंत,श्री  अनंतराव भोसले, महिला उपविभाग संघटक रचना सावंत, शालिनी सावंत,नगरसेवक श्री सुरेश गांगण, माजी नगरसेवक श्री प्रवीण शिंदे, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, श्री बाळा नर,महिला शाखा संघटक सौ मंजिरी परब,ज्ञानेश्वर सावंत,युवसेनेचे उपविभाग अधिकारी विशाल परब,श्री अनिल म्हसकर, धनंजय शेट्टी,स्थानिक रहिवाशी व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा