शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

शिवसेनेला जर विरोध कराल तर डोके फोडले जातील लक्षात ठेवा

 
 (श्वेता मोरे )
   शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होय. त्यांच्या विषयी माझ्या मनात कायमच एक आदराचे स्थान राहिले आहे त्यांच्याबद्दलचे माझे मत येथे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक असे नाव ज्याच्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास यापुढे लिहला जाऊ शकत नाही. गेली ५० वर्ष ते आपल्या वाणीने,लेखणीने आणि कुंचल्याने महाराष्ट्र गाजवत आहेत त्यांची भाषा तर 'ठाकरी भाषा' म्हणुन ओळखली जाते तसे असले तरी एक व्यंगचित्रकार असल्यामुळे त्यांच्या भाषणात मिश्किल्पनाही जाणवतो.राजकारणाच्या पसारयात हाच एक असा नेता आहे ज्याने कधीही आपल्या शिवसैनिकाला दगा दिला नाही.जबाबदारी स्वता स्वीकारली. 'मी असे बोललोच नाही' हे वाक्य बाळासाहेबांनी गेल्या ५० वर्षात कधी काढला नाही मग ते बाबरी पतन असू दया नाहीतर दुसरे काहीही बाळासाहेबांनीच महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आत्मविश्वास जागा केला. म्हणुनच मराठी मध्यमवर्गाला बाळासाहेबांविषयी विशेष प्रेम होत आणि अजुनही आहे . ज्याच्या हाकेला काही तासातच लाखो लोक जमतील असा एकमेव नेता महाराष्ट्रात आहे आणि तो म्हणजे फक्त शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे. शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी गरिबांना राजकारणात मोठी पदे आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. कांग्रेसी राजकारणात मागे पडलेले किंवा पडले असते अशा बहुजन समाजातील गरिबांच्या मनात बाळासाहेबांनी राजकीय महत्वकांक्षा निर्माण केलि आणि वाढवित नेली . शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आणि स्पर्श लाभला तर जीवनाचे सोने होते याची कितीतरी उदाहरणे आज महाराष्ट्रात आहेत. बाळासाहेबांचे हिन्दुत्व म्हणजे प्रखर राष्ट्रायीत्व हे कधीही लपून राहिलेले नाही. त्यांनी कधीही राष्ट्रवादी मुस्लिमांचा अपमान केला नाही उलट अशाच राष्ट्रवादी मुस्लिमांची देशाला गरज आहे असे सांगितले . बाळासाहेबांनी ५० वर्षात खुप वादळे निर्माण केलि आणि खुप वादळे झेललीसुद्धा परंतु ते कधीही डगमगले नाहीत एक सामान्य नागरिक ते शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुख ते जगभर हिंदूंचे हिंदूहृदयसम्राट अशी झंजावती वाटचाल करीत असताना त्यानी स्वतातिल माणुस कटाक्षाने जपला. अशा या माझ्या दैवताला आई जगदंब उदंड आयुष्य देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा