सोमवार, २६ डिसेंबर, २०११

अण्णा, उपोषणाचे मार्केटिंग करू नका !


(   भाई मिर्लेकर )                  
    हिंदुस्थानची  संसद हीच सर्वोच आणि सार्वभौम आहे लोकपालवर संसदेमध्ये संविधानाचा नियमाप्रमाणे चर्चा चालू असताना पुन्हा उपोषणाचा बडगा दाखवण्याची गरजच काय ? व त्यासाठी लाखो रुपये खर्च करून मुंबईमध्ये एम एम आर डी ए च्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स च्या मैदानावर उपोषण करण्यासाठी प्रचंड तयारी व प्रचंड खर्च करण्याची की गरज आहे ? हे प्रश्न आज अण्णा हजारेना पाठींबा केणाऱ्या जनतेलाही पडलेला आहे.  खर म्हणजे उपोषण हे एक असे अस्त्र आहे कि त्यामुळे जनमानसावर जर सरकार किवा अन्य कुणाकडून अन्याय होत असेल तर उपोषण केले जात होते पण अण्णा हजारे यांनी उपोषण हे एक अस्त्र नसून क्षेपणास्त्र आहे व त्यामुळे सरकारवर दबाव टाकून वाट्टेल तसे सरकारला वाकवता येऊ शकतं असे समीकरण दाखऊन दिले आहे. पण हे लोकशाहीला घटक आहे.  जनतेने आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर अविश्वास दाखवल्यासारखे आहे.  न्यायालय आणि संसद यांना समांतर एक नवीन यंत्रणा राबून दाखऊन जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा जी यंत्रणा आहे त्यामध्ये सुधारणा करण्याची व मानसिकता बदलण्याची गरज आहे.  आणि जर हे असेच चालू राहिले तर उपोषणावर कोणीही विश्वास ठेवणार नाही अण्णांनी अतिउत्साही सहकार्यांचा सल्ला मानू नये तर आपल्या मनाचा आवाज ऐकावा व आमचे पूर्वीचे अण्णा लोकांना भावतील असे करावे.उपोषणाचे मार्केटिंग करू नये. टीम अन्ना चा अतिउत्साह आतापर्यंत कित्येकवेळा अण्णांना त्रासदायक ठरलेला आहे.  तरीही अण्णा त्यांच्या आहारी जातात याचे आश्चर्य वाटते.  सत्याग्रह हा उपद्रव ठरू नये.
       शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीरपणे मांडून टीम अण्णा व खुद्द अण्णा हजारे यांना देखील मित्रत्वाचा सल्ला दिला होता.  व बाळासाहेब म्हणाले होते कि, लोकपालच सर्व निर्णय घेणार असतील तर संसदेला काय किंमत राहिली ? लोकांनी निवडून दिलेले हे प्रतिनिधी असतात.  त्यांच्या ऐवजी तुम्ही स्वतंत्र दालन उभे करता आणि हुकुमत गाजवता. अधिकार तुम्हाला हवेत. तुम्ही फासावर देणार ही कसली लोकशाही ? लोकशाहीत संसद सार्वभौम आहे आणि संसदेचा मान राखला गेलाच पाहिजे. अश्या परखड  भूमिकेला समर्पक असाच निकाल उच्च न्यायालयाने दिला वक़ न्यायालय म्हणाले  अण्णा, उपोषणाला घरी बसा !
                                                                                                    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा