रविवार, २६ जून, २०११

जोगेश्वरी मध्ये शिवसेनेचे ’आरोग्य अभियान’


जोगेश्वरी पूर्व विधान सभा क्षेत्राचे शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनी मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून विनामूल्य आरोग्या चिकित्सा व मोफत औषधोपचार शिबिर आयोजित केले. शाम नगर तलाव परिसरामध्ये आयोजित या शिबिरात शेकड़ो रुग्णांनी याचा लाभ घेतला असून यामधील अधिकांश तापाचे रुग्ण आढळून आले.
बीएमसीचे उपायुक्त मनिषा म्हैसकर व महानगर पालिकेचे मोठ्या डॉक्टरांच्या उपस्थिती मध्ये शिबिराची सुरूवात होऊन मोठ्या प्रमाणात रूग्णांची तपासणी झाली. यावेळी संपूर्ण तपासणी करतांना मोफत औषधेही देण्यात आले. तसेच लहान मुलांनाही पोलियो डोस पाजण्यात आले. मोठ्या आजारासाठी रूग्णांना विविध रुग्णालयामध्ये पाठविण्यात करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सुरूवात करतांना    नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ श्री रननावरे व डॉ वंदना, केईमचे डॉ. संजय ओक, मनपाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बांदिवड़ेकर, सह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ अरूण बामणे, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ श्रीधर कुबल, डॉ प्रशांत मिस्त्रि, डॉ अशोक इंगळे, सहायक आयुक्त के पूर्व विश्वास शंकरवार आदि अनेक २५ पेक्षा जास्त डॉक्टरांची टीम व अन्य मान्यवर उपस्थित होते. याव्यतिरिक्त शिवसेनेचे महिला विभाग संघटक साधना माने, रचना सावंत, शालिनी सावंत, उपविभाग प्रमुख अनंतराव भोसले, विश्वनाथ सावंत,  नगरसेविका सौ सुमंगल कोलथरकर, शाखाप्रमुख बाळा नर, अमर मालवणकर, जयवंत लाड़, प्रदिप गांधी, सुधाकर सावंत, महिला शाखा संघटक निलाक्षी भाबल, सौ जयश्री चव्हाण, शैलजा नरवणकर, दिपाशा पवार, वैशाली भिंगार्ड़े, व्यापार विभाग सेनेचे ज्ञानेश्वर सावंत व भाई मिर्लेकर,इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अरविंद सावंत, दशरथ कदम, नरेंद्र पेडणेकर, नितिन गायकवाड़ यांनी शिविर यशस्वी करण्याकरीता विशेष परिश्रम केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा