शुक्रवार, १२ जुलै, २०१३

अंधेरी पश्चिम येथील सुनील शॉपिंग सेंटर इमारत पडण्याच्या स्थितीत

अतिधोकादायक इमारतीमध्ये रहिवाश्यांचा वावर व दुकानेही चालू 

        (भाई मिर्लेकर)   

मुंबई - अंधेरी पश्चिमेकडील मेट्रो रेल्वे लगत असलेल्या नवरंग सिनेमा थियेटर समोरील अरगन उगमशी गडा ( भगत ) चौक येथील सुनील शॉपिंग सेंटर को - ऑ सोसायटी च्या इमारतीमध्ये सुमारे १ ५ ० सदनिका आहेत या दोन मजली इमारतीची अवस्था अतिशय बिकट झालेली असून १ ९ ६ ९ सालची ही इमारत आता धोकादायक स्थितीत आहे तरी देखील या इमारतीमधील रहिवाशी व दुकानदार निद्रीस्थावस्थेमध्ये दिसत आहेत .  तेथील दुकानदारांकडे चौकशी केली असता ते हे हतबल झालेले दिसून आले. रहिवाश्यांमध्ये मतभेद असून अद्याप इमारत पुनर्बांधणी करिता सक्षमपणे निर्णय घेतला जात नसल्याचे सांगण्यात आले . 

         या इमारतीकडे मुंबई महानगर पालिकेने जर गंभीरपणे पाहून कडक कार्यवाही केली नाही तर ज्या प्रमाणे मुंब्रा व माहीम येथील इमारती धडाधड कोसळून जीवित व वित्त हानी झाली तशी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहि.  तरी संबंधितानी वेळीच लक्ष देऊन गम्बीरपणे हा प्रश्न सोडवावा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा