महापौरांच्या हस्ते जोगेश्वरीत मोफत रुग्ण वाहिका व रुग्ण सेवेचे उद्घाटन शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांचा उपक्रम
शिवसेना कार्याप्रमुख मा. श्री उद्धवजी ठाकरे यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त जोगेश्वरी विधानसभेच्या क्षेत्राचे आमदार श्री रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ मुंबईचे महापौर श्री सुनील प्रभू यांच्या हस्ते मोफत रुग्ण वाहिका व रुग्ण सेवेचे उद्घाटन केले. सर्वसामान्य नागरिकांना धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष्य द्याला वेळ नसतो व सध्याच्या महागाईच्या काळात औषधे घेणेही परवडत नाहीत. म्हणून सकाळी ८ ते रात्रो ८ पर्यंत नागरिकांसाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे या रुग्नावाहीकेमध्ये सितीस्क्यान, वेन्तीलेतर, इत्यादी सुविधांनी सुसज्ज आहे. डॉक्टर प्रफुल्ला कुलकर्णी, डॉक्टर हेमंत पोतनीस यांच्या सहकार्याने ही सेवा चालू राहणार आहे. अत्यावशक वेळी डॉक्टर कुलकर्णी यांचे हॉस्पिटलही मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक श्री अनंत नर, जितेंद्र वळवी, शिवानी परब, मांजरी परब, तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी , शिवसैनिक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा