शनिवार, २८ जुलै, २०१२

रोजगार सुवर्णसंधी वर्ग - शिवसेनेचा जोगेश्वरीतील उपक्रम


   
जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी अंधेरी व गोरेगाव परिसरातील बेरोजगार युवक व युवतींकरिता रोजगार सुवर्णसंधी वर्गाचे आयोजन रविवारी दिनांक २५ जून २०१२ रोजी इत्च्यापुर्ती गणेश मंदिरजवळ येथे केले  होते.  इंडिया स्किल्स चे श्री राहुल शाह यांनी या कार्यक्रमामध्ये बेरोजगारांना त्यांच्या शैक्षणिक  योग्यतेनुसार विविध कंपन्यांमध्ये व आस्थापनांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या इंडिया स्किल्स च्या माधमातून प्रयत्न करू असे सांगून उपस्थित बेरोजगार तरुण व तरुणींकडून अर्ज भरून घेतले व येत्या महिन्याभरात नोकरी मिळून  देण्यात येईल असे सांगितले.  या प्रसंगी आमदार रवींद्र वायकर यांनी आपला स्वतःचा अनुभव कथन करून आजच्या युवा पिढीने नोकरीबरोबरच उद्योग धंद्यांमध्ये जास्त प्रयत्न करावेत व त्यासाठी शिवसेना त्यांना सर्वतोपरी सहकार्य करून आपला उद्योग धंदा उभा करण्यास सक्षम करील.  
  या प्रसंगी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख अनंतराव भोसले,विश्वनाथ सावंत, शालिनी सावंत, रचना सावंत, नगरसेवक जितेंद्र वळवी,,परब , शाखाप्रमुख जयवंत लाड गांधी, महिला शाखाप्रमुख शैलजा नरवणकर,माजी शाखाप्रमुख  रघुनाथ कदम ,भाई मिर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा